Budget 2023 : मी अर्ध्या तासात गरीबांसाठी बजेट तयार करू शकते; ममता बॅनर्जींचं आव्हान

या बजेटमध्ये कोणताही आशेचा किरण मिळत नाही, तर पूर्णपणे अमावस्येचा अंधार आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
Mistake in the security of Chief Minister Mamata Banerjee
Mistake in the security of Chief Minister Mamata BanerjeeMistake in the security of Chief Minister Mamata Banerjee

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प जनविरोधी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच मी अर्ध्या तासांत गरीबांसाठी बजेट तयार करु शकते, असंही त्या म्हणाल्या आहेत.

हे बजेट भविष्यवेधी नाही तर पूर्णपणे संधीसाधू बजेट आहे. या बजेटमध्ये कोणताही आशेचा किरण मिळत नाही, तर पूर्णपणे अमावस्येचा अंधार आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प गरीबांच्या विरोधातला आहे. या बजेटमध्ये गरीबांची उपेक्षा करण्यात आली आहे.

हेही वाचा - पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मला अर्धा तास द्या, मी दाखवून देईन की गरीबांसाठी बजेट कसं तयार केलं जातं, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार आता सगळं काही विकत आहे. सरकारी संपत्तीचा अपव्यव करत आहेत. देशभरात ४० टक्के नोकऱ्या कमी झाल्या आहेत, पण सरकारने एकही नवी नोकरी निर्माण केली नाही, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com