#Budget2018 जेटली उवाच.... आरोग्य क्षेत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

देशातील 10 कोटी गरीब कुटूंबांसाठी "आरोग्य योजना' घोषित. यामधील प्रत्येक गरीब कुटूंबासाठी दर वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत तरतूद. ही जगातील सर्वांत मोठी सरकार प्रायोजित योजना आहे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना देशातील सुमारे 10 कोटी कुटूंबांना वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य योजनेची घोषणा केली. आरोग्य क्षेत्रांतील इतर तरतुदींच्या घोषणाही जेटली यांनी यावेळी केल्या.

जेटली म्हणाले - 

  • देशभरातील आरोग्य केंद्रांसाठी (हेल्थ वेल्सनेस सेंटर्स) सरकारकडून 1200 कोटींची तरतूद.
  • देशातील 10 कोटी गरीब कुटूंबांसाठी "आरोग्य योजना' घोषित. यामधील प्रत्येक गरीब कुटूंबासाठी दर वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत तरतूद. ही जगातील सर्वांत मोठी सरकार प्रायोजित योजना आहे.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा रुग्णालयांच्या विकासाबरोबरच देशभरात 24 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली जाईल. यामुळे प्रत्येक तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल.
Web Title: #Budget2018 Arun Jaitley Health Sector