या अर्थसंकल्पाची आकडेवारी चुकीची आहे: मनमोहन सिंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

निवडणूक डोळ्यांपुढे ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असे मी म्हणू शकेन, असे मला वाटत नाही. मात्र या अर्थसंकल्पामधील वित्तीय आकडेवारी चुकीची असू शकते

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामधील वित्तीय आकडेवारी चुकीची असल्याची शक्‍यता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे.

""निवडणूक डोळ्यांपुढे ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असे मी म्हणू शकेन, असे मला वाटत नाही. मात्र या अर्थसंकल्पामधील वित्तीय आकडेवारी चुकीची असू शकते,'' असे सिंग म्हणाले. "सुधारणा' हा शब्द आत्तापर्यंत अनेकदा चुकीच्या अर्थी वापरला गेल्याचा टोलाही सिंग यांनी यावेळी लगावला.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव देण्याची घोषणा केली.  मात्र, हे कशाप्रकारे साध्य होणार, अशी विचारणा सिंग यांनी केली आहे. 

Web Title: Budget2018 Manmohan Singh India Arun Jaitley