हा अर्थसंकल्प सर्वांच्याच हिताचा: नितीशकुमार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य आणि कृषि क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. केंद्र सरकारने स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेची घोषणा केली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे

पटना - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (गुरुवार) केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना धन्यवाद देताना नितीशकुमार यांनी हा अर्थसंकल्प संतुलित व सार्वत्रिक हिताचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

"या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य आणि कृषि क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. केंद्र सरकारने स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेची घोषणा केली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे,'' असे नितीशकुमार म्हणाले.

पटना येथे आज खादी महोत्सवाचे उद्‌घाटन करताना नितीशकुमार यांनी अर्थसंकल्पासंदर्भातील ही भूमिका स्पष्ट केली

Web Title: Budget2018 NitishKumar Arun Jaitley