esakal | बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावरून सातत्यानं विरोधक बिहारच्या सरकारवर टीका करत असून बिहारमध्ये गुंडाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावरून सातत्यानं विरोधक बिहारच्या सरकारवर टीका करत असून बिहारमध्ये गुंडाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यादरम्यान, एक आणखी गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह जखमी झाला आहे. सहरसा इथं राजकुमार सिंह आणि त्याच्या मित्रांना गुन्हेगारांनी गोळी मारली. 

गोळीबारामध्ये राजकुमार सिंह गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजकुमार सिंह यांचे सरहसा इथं यामाहाचे मोटारसायकलचं शोरुम आहे. या घटनेवेळी राजकुमार सिंह त्यांचा सहकारी अली हसन यांच्यासोबत शोरूमला जात होते. मोटार सायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी राजकुमार सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. 

हे वाचा - शत्रूंना घाम फोडणाऱ्या मोसादची भारतात एन्ट्री! इस्त्रायल दुतावासावरील हल्ल्याचा करणार तपास

दिवंगत सुशांत सिंह राजपूत याचा मावसभाऊ राजकुमार सिंहच्या कारला ओव्हरटेक केल्यानंतर गोळीबार केला गेला. या घटनेनंतर राजकुमार सिंह यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. राजकुमार यांची सहरसा, माधेपुरा आणि सुपौल जिल्ह्यात तीन यामाहाची शोरूम आहेत. ते नेहमीच याठिकाणी जात असतात. 

दरम्यान, सहरसाच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, राजकुमार आणि अली हसन जेव्हा सहरसा कॉलेजजवळ बैजनाथपूर चौकात आले, तेव्हा अज्ञातांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केला. गाडीच्या पुढे गेल्यानंतर तिघांनीही गोळीबार केला. याप्रकऱणी महत्त्वाची माहिती मिळाली असून आरोपींना लवकरच पकडलं जाईल.