बुलेट ट्रेनला हवी स्वत:ची वेगळी ओळख

बुलेट ट्रेनला हवी स्वत:ची वेगळी ओळख

नवी दिल्ली : "महाराजा' ही जशी एअर इंडियाची ओळख आहे, त्याप्रमाणेच भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनलाचीही स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या ट्रेनला नाव आणि तिची ओळख ठरू शकणारा शुभंकर सुचविण्यासाठी देश पातळीवर स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान 2022 मध्ये धावणार असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे. या ट्रेनला नाव आणि तिचा शुभंकर सुचविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रेल्वे महामंडळाने (एनएचआरसीएल) स्पर्धेची योजना आखली असून 25 मार्चपर्यंत शिफारसी करण्यास मुदत देण्यात आली आहे. "शुभंकर हा योग्य प्रकारे डिझाइन केलेले पात्र असावे, त्याद्वारे महामंडळाची मूल्यांना जिवंत रूप यावे आणि त्याला प्रभावीपणे संपर्कही करता यावा,' असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. बुलेट ट्रेनला विशिष्ट नाव दिल्याने तिची वेगळी ओळख निर्माण होऊन ती नागरिकांच्या परिचयाची होईल, असे महामंडळाने सांगितले.

सरकारच्या mygov.in वर होणारी ही ऑनलाइन स्पर्धा असणार आहे. या संकेतस्थळावर भेट देऊन इच्छुक याबाबतची अधिक माहिती मिळवू शकतात. ट्रेनसाठी सुचविलेली नावे आणि शुभंकर यातून एक समिती अंतिम यादी तयार करणार असून, विजेत्यांना रोख बक्षिसाशिवाय प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com