शेतकऱ्यांसाठी बुरे दिन : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. परंतु मी त्यांना उत्तर मागितले तर ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते. एकही शब्द बोलले नाहीत.

हाथरस : पंतप्रधानांनी अच्छे दिन येणार असल्याचे जाहीर केले होते. अच्छे दिन आले ते उद्योगपतींसाठी. शेतकऱ्यांसाठी मात्र "बुरे दिन' आहेत अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. त्यांना शेतकऱ्यांची दया आली नाही आणि कर्जही माफ केले नाही. आता वेळ आली असून उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना मतपेटीतून उत्तर द्यावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी आज जाहीर सभेत केले.

राहुल म्हणाले की, मुंबईत राहणारे आणि मोठमोठ्या गाडीत फिरणाऱ्यांचे, खासगी जेट विमानातून फिरणाऱ्यांचे कर्ज पंतप्रधानांनी माफ केले आहे. आपण जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. परंतु मी त्यांना उत्तर मागितले तर ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते. एकही शब्द बोलले नाहीत. मला उत्तर दिले नाही. आता त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत गांधी यांनी टीका केली. नोटाबंदीच्या निर्णयाबाबतही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

 

Web Title: bure din for farmers, says rahul gandhi