बुऱ्हाणचे वडिल म्हणतात 'शाळा जाळणे चुकीचे'

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

पुलवामा : 'जम्मू-काश्‍मिरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून शैक्षणिक संस्था जाळण्यात येत आहेत. अशा प्रकारे शाळा जाळणे चुकीचे आहे', अशा शब्दांत हिज्बुल मुजाहिद्दीचा चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुऱ्हाण वाणीचे वडिल मुझफ्फर वाणी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पुलवामा : 'जम्मू-काश्‍मिरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून शैक्षणिक संस्था जाळण्यात येत आहेत. अशा प्रकारे शाळा जाळणे चुकीचे आहे', अशा शब्दांत हिज्बुल मुजाहिद्दीचा चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुऱ्हाण वाणीचे वडिल मुझफ्फर वाणी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना मुझफ्फर वाणी म्हणाले, "शाळा या जम्मू-काश्‍मिरच्या मालकीच्या आहेत. शाळा जाळण्याचा प्रकार कोण करत आहे हे माहिती नाही. अशा प्रकारे शाळा जाळणे चुकीचे आहे. हा केवळ आपल्या मुलांच्या संबंधित विषय नाही. मात्र जम्मू-काश्‍मिरमधील कामगार, दुकानदार, वाहतूक व्यावसायिक सर्वांना त्रास होत आहे. सध्याच्या स्थितीत आपण सर्वांचा विचार करून या सर्व प्रकारावर मार्ग शोधायला हवा.' तसेच "जम्मू काश्‍मीरमध्ये 2008 आणि 2010 मध्ये अशा प्रकारे अस्थिरता निर्माण झाली होती. आता पुन्हा 2016 साली आम्ही अशाच घटनेचे साक्षीदार होत आहोत', असेही ते पुढे म्हणाले. "जर आपण आज या सर्वांवर आज मार्ग शोधला तरच आपण उद्याचे भविष्य पाहू शकू. हा सर्व प्रकार संपविण्यातच साऱ्यांचे भले आहे', असेही ते पुढे म्हणाले.

जम्मू-काश्‍मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक संस्था जाळण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी उच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेत सर्व संबंधित यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला शाळा पेटवून देण्याच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले आहेत. दक्षिण काश्‍मीरमध्ये लष्कराने जुलैमध्ये बुऱ्हाण वाणीला ठार केल्यानंतर राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत अज्ञात जमाव अनेक शैक्षणिक संस्था पेटवून देत आहे. शिवाय फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

Web Title: Buring education institutes is wrong : Burhan's father