अस्वच्छतेमुळे रुग्णाचा मृत्यू; कुटुंबियांना 8 लाख देण्याचे रुग्णालयाला आदेश

पीटीआय
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - उपचारादरम्यान अस्वच्छ बेडवर हलविल्याने झालेल्या रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार ठरवत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मृताच्या कुटुंबियांना आठ लाख रुपये देण्याचे रुग्णालयाला आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - उपचारादरम्यान अस्वच्छ बेडवर हलविल्याने झालेल्या रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार ठरवत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मृताच्या कुटुंबियांना आठ लाख रुपये देण्याचे रुग्णालयाला आदेश दिले आहेत.

चंदीगढस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा प्रकार घडला. फटाक्‍यामुळे भाजल्याने हितेंद्र कक्कर यांना 26 ऑक्‍टोबर 2008 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाक, कान, छातीसह शरीरावर अन्य काही ठिकाणी जळाल्याच्या जखमा झाल्याने कक्कर 50 टक्के भाजले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 7 नोव्हेंबर 2008 रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या अन्य एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत रुग्णाचा बेड स्वच्छ न करता काही तासातच कक्कर यांना त्याच बेडवर हलविण्यात आले. बेडवरील बेडशिटही बदलण्यात आली नव्हती. "कक्कर यांना ज्या बेडवर हलविण्यात आले होते, रुग्णालयाने निष्काळजीपणामुळे त्या बेडची स्वच्छता आणि निजर्तुंकीकरण केले नव्हते', असा निर्णय के. एस. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाने दिला आहे.

अस्वच्छतेमुळे संसर्ग, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आणि डॉक्‍टरांची निष्ठुर वागणूक यामुळेच कक्कर यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे सारे आरोप फेटाळून लावत रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे उपचार आणि काळजी घेण्यात आल्याचा दावा केला आहे.

Web Title: Burn victim's death: Chandigarh hospital to pay Rs 8L to kin