ग्वाल्हेरजवळ आंध्र प्रेदश एक्स्प्रेसला भीषण आग

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

दिल्लीवरुन विशाखापट्टनमला जाणारी 22416 आंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या चार डब्यांना भिषण आग लागली. आगीचे कारण आजून समजू शकले नाही. ग्वाल्हेरच्या आधी येणारे बिर्लानगर रेल्वेस्टेशनजवळ एक्सप्रेस येत होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून यात कसलीही जिवीत हाणी झाली नाही.

ग्वाल्हेर : दिल्लीवरुन विशाखापट्टनमला जाणारी 22416 आंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या चार डब्यांना भिषण आग लागली. आगीचे कारण आजून समजू शकले नाही. ग्वाल्हेरच्या आधी येणारे बिर्लानगर रेल्वेस्टेशनजवळ एक्सप्रेस येत होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून यात कसलीही जिवीत हाणी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अचानक झालेल्या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी घाबरून गेले. गाडीला आग लागल्याचे समजताच लोको पायलटने रेल्वे थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

Web Title: burning train in gwalior