खासगी बसला अपघात; २४ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी

वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कोटा (राजस्थान) : राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील कोटा-दौसा महामार्गावर लग्न समारंभाहून येणारी खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात २४ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही बस सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास कोटा येथून सवाई माधोपूरकडे जात असताना पापडी गावानजीकच्या नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने नदीत कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. या वेळी बसमधून २९ जण प्रवास करत होते. या घटनेत चालकासह तेरा जण जागीच ठार झाले, तर जखमींमधील काही जणांचा लाखेरी शहरातील रुग्णालयात जात असताना मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यांनी दिली.

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

या घटनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुःख व्यक्त केले असून, त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आणि घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे होण्याची आशा व्यक्त्य केली. तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus accident in Rajasthan: 24 dead as bus falls into river in Bundi

टॅग्स
टॉपिकस