चेन्नईत रस्त्याला भगदाड; बस, कार कोसळली

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

अण्णा सलाई रस्त्यावर अचानक भगदाड पडले. यामुळे कार आणि बस त्यामध्ये कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने या दोन्ही गाड्या खड्ड्याबाहेर काढण्यात आल्या.

चेन्नई - चेन्नईत मेट्रोच्या काम सुरु असलेल्या रस्त्याला अचानक भगदाड पडल्याने बस आणि कार त्यामध्ये कोसळली.

तमिळनाडूचे अर्थमंत्री डी. जयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अण्णा सलाई रस्त्यावर अचानक भगदाड पडले. यामुळे कार आणि बस त्यामध्ये कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने या दोन्ही गाड्या खड्ड्याबाहेर काढण्यात आल्या.

मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्याला हे भगदाड पडले. वेदापलानी येथे चाललेली ही बस बस स्टॉपवर थांबल्यानंतर खाली जात असल्याचे चालकाला आढळून आले. बसचा टायर पंक्चर झाल्याचे चालकाला वाटले, पण, बस खड्ड्यात खाली जात होती. त्यामुळे चालकाने सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून उतरण्यास सांगितले. आज हा रस्ता बंद ठेवण्यात आला असून, डागडुजीनंतर तो चालू करण्यात येणार आहे.

Web Title: Bus, car trapped as Chennai road caves-in