बस दरीत कोसळून दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

सुरत येथील खासगी क्लासमधील 80 विद्यार्थी घेऊन ही बस (जीटी 5 झेड 9993) सहलीसाठी सापुतारा येथे आली होती. सहलीहून परतताना डांग व कळवण तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या महाल या गावाजवळील बर्डीपाडा येथील वळणावरील दुधाला गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस तीनशे फूट दरीत कोसळली.

नवसारी : गुजरातमध्ये सापुताऱ्याजवळील बर्डीपाडा-महाल रस्त्यावर शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 हून अधिक विद्यार्थी जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील खासगी क्लासमधील 80 विद्यार्थी घेऊन ही बस (जीटी 5 झेड 9993) सहलीसाठी सापुतारा येथे आली होती. सहलीहून परतताना डांग व कळवण तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या महाल या गावाजवळील बर्डीपाडा येथील वळणावरील दुधाला गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस तीनशे फूट दरीत कोसळली. 

या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी विद्यार्थ्यांना आहवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी 21 विद्यार्थी जखमी आहेत. एका खासगी क्‍लासचे विद्यार्थी डांग येथील ऐतिहाससिक वास्‍तूंना भेट देण्यासाठी गेले होते. सर्व विद्यार्थी सूरतमधील अमरोली येथील आहेत. विद्यार्थ्यांबरोबर खासगी क्‍लासचे शिक्षकही होते.

Web Title: bus fell in george at Saputara 10 students dead

टॅग्स