बस, रेल्वे, विमान तिकिटांसाठी जुन्या नोटा 10 डिसेंबरपर्यंतच

पीटीआय
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - सरकारी बस, मेट्रो आणि रेल्वे तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा 10 डिसेंबरपर्यंतच स्वीकारण्यात येणार आहेत. याआधी ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत होती.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रेल्वे, मेट्रो आणि विमान तिकिटे (फक्त विमानतळावर) तसेच, रेल्वे केटरिंग सेवेसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे याआधी केंद्र सरकारने म्हटले होते. आता ही मुदत कमी करून 10 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आणण्यात आली आहे.

सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा चलनातून 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. त्यानंतर पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या आहेत. तसेच, रिझर्व्ह बॅंक 20, 50 आणि 100 च्या नव्या नोटा लवकरच चलनात आणत असून, या रकमेच्या चलनातील जुन्या नोटा कायम राहणार आहेत.

Web Title: Bus, train, plane tickets for 10 december old currency