पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या बसने घेतला अचानक पेट, बस जळून खाक

सुदैवाने ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी सुखरुप आहे तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे.
Burning Bus
Burning Busटिम ई सकाळ

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या एका मनिष ट्रॅव्हल्सने (नं. जीए ०३/डब्लू २५१८) गुरुवारी पहाटे अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही ट्रॅव्हल्स संपुर्ण जळून खाक झाली आहे. ही घटना आजपहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी जवळ घडली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवाने ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी सुखरुप आहे तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे.

Burning Bus
राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य असमर्थनीय; अमेरिकेने मंत्रालयाने सुनावलं

मनिष ट्रॅव्हल्स ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात असताना करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव जवळ ही बस येताच बसने अचानक पेट घेतला मात्र सुदैवाने चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली आणि बसमधील प्रवासी खाली उतरले. त्यानंतर बसने अचानक मोठा पेट घेतला. त्यानंतर सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com