आणखी एका मोदीने केले भारताला बदनाम

worldbank
worldbank

नवी दिल्ली : जागतिक बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार काही भारतीय कंपन्या व भारतीय व्यावसायिकांवर बंदी घातली आहे. पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीनंतर आता जय मोदी या भारतीय व्यायवसायिकावर जागतिक बँकेने बंदी घातली आहे. 

या अहवालानुसार, जागतिक बँकेने भारतातील ऑलिव्ह हेल्थकेअर व जय मोदीवर फसवणूकीप्रकरणी बंदी घातल्याची माहिती दिली आहे. भारतातील अँजेलिक इंटरनॅशनल लिमीटेड, फॅमिली केअर, मधुकॉन प्रोजेक्टस लिमीटेड, आरकेडी कन्स्ट्रक्शन्स लिमीटेड या कंपन्यांचा बंदी घातलेल्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. ऑलिव्ह हेल्थकेअर ही कंपनी बांग्लादेशातील जागतिक बँकेच्या एका प्रकल्पावर काम करत होती. 

ऑलिव्ह हेल्थकेअर कंपनीवर 10 वर्षे 6 महिने आणि जय मोदीवर 7 वर्षे 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार भारतातील अँजेलिक इंटरनॅशनल लि.वर 4 वर्षे 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या यादीत फॅमिली केअर या भारतीय कंपनीचा समावेश आहे, जिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मधुकॉन प्रोजेक्टस लिमीटेड. वर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, तर आरकेडी कन्स्ट्रक्शनवर दीड वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com