पणजी पोटनिवडणुकीत ईव्हीएम यंत्रात बिघाड

evm
evm

गोवा : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 29.52 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत 30 मतदान केंद्रापैकी दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला आहे.

मतदान केंद्र 9 या मासिनो दी आमोरीम येथे यंत्र बदलण्यात आले असून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर स्थानिक पोलिसांसह जादा निमलष्करी दलाचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेंकर व गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सकाळीच मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात व आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नाईक हेही निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक भाजपला प्रतिष्ठेची बनली आहे. सर्व पक्षाचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मतदारांची मते मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ दिसून येत आहे. मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com