श्रीनगरसह आठ राज्यातील पोटनिवडणूकीसाठी आज मतदान

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. तर देशभरातील आठ राज्यातील दहा विधानसभा जागांसाठीही आज पोटनिवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी मतदानाला प्रारंभ झाला आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. तर देशभरातील आठ राज्यातील दहा विधानसभा जागांसाठीही आज पोटनिवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी मतदानाला प्रारंभ झाला आहे.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. बारा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या या मतदारसंघासाठी 1500 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व मतदान केंद्रांना संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघासाठीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. ही निवडणूक म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची चाचणी समजण्यात येत आहे.

खालील राज्यातील विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

  • मध्यप्रदेश : उमारिया जिल्ह्यातील बांधवगड मतदारसंघ आणि भिंड जिल्ह्यातील अतेर विधानसभा मतदारसंघ
  • हिमाचल प्रदेश : भोरंज विधानसभा मतदारसंघ
  • पश्‍चिम बंगाल : कांती दक्षिण मतदारसंघ
  • आसाम : धेमजी मतदारसंघ
  • राजस्थान : ढोलपूर मतदारसंघ
  • कर्नाटक : नंजनगुड आणि गुंडलूपेठ मतदारसंघ
  • झारखंड : लितीपराह मतदारसंघ

या सर्व जागांवरील मतमोजणी 13 एप्रिल रोजी होणार आहे.

Web Title: Bypolls for 10 assembly segments in 8 states begin