गोव्यात मंत्रिमंडळ विस्तार; चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या तीन आमदारांसोबत एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 

पणजी : गोव्यात मंत्रिमंडळाचा विस्तार आज (शनिवार) पार पडला. काँग्रेसच्या दहा आमदारानी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या तीन आमदारांसोबत एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल (शुक्रवार) दिले होते. त्यानंतर या मंत्रिपदाची जागा रिक्त झाल्याने दुपारी झालेल्या शपथविधीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणारे बाबू कवळेकर, फिलीप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांना आज दुपारी मंत्रिपदाची शपथ देण्यात आला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet expansion in Goa Four MLAs sworn in as ministers