'Cafe Coffee Day'चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता; शोध सुरु

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

सिद्धार्थ हे 29 जुलैला सिद्धार्थ हे बेंगळुरला येत असताना मंगळूरजवळील नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलाजवळ ते कारमधून उतरले, त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. ही बातमी पसरताच, एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. नेत्रावती नदीजवळ ते उतरले होते आणि अचानक बेपत्ता झाले.

बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सिद्धार्थ हे 29 जुलैला सिद्धार्थ हे बेंगळुरला येत असताना मंगळूरजवळील नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलाजवळ ते कारमधून उतरले, त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. ही बातमी पसरताच, एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. नेत्रावती नदीजवळ ते उतरले होते आणि अचानक बेपत्ता झाले. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही चौकशी केली आहे.

सिद्धार्थ सोमवारी बेंगळुरला येत होते, त्याच दरम्यान संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ते कारमधून उतरले आणि या पुलाजवळ फिरू लागले. तेव्हापासून त्यांच्याशी काहीही संपर्कही होऊ शकलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cafe Coffee Day founder VG Siddhartha goes missing in Manglore