'पूर्ण न्यायालय' बोलविण्याची दोन न्यायाधीशांची मागणी

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या समस्या कमी होताना दिसत नाही. आता रंजन गोगोई आणि मदन लोकुर या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे भविष्य आणि संस्थांतर्गत समस्यांवर चर्चा करण्यासाठी "पूर्ण न्यायालय' बोलावण्याची मागणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्राद्वारे केली आहे. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या समस्या कमी होताना दिसत नाही. आता रंजन गोगोई आणि मदन लोकुर या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे भविष्य आणि संस्थांतर्गत समस्यांवर चर्चा करण्यासाठी "पूर्ण न्यायालय' बोलावण्याची मागणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्राद्वारे केली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच कॉंग्रेससह सात विरोधी पक्षांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासंबंधी दिलेली नोटीस राज्यसभा सभापती तसेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी फेटाळली होती. न्यायाधीश गोगोई आणि न्यायाधीश लोकुर यांनी रविवारी पत्र पाठवले असून, ते कॉलेजियमचेही सदस्य आहेत. सरन्यायाधीश मिश्रा हे ऑक्‍टोबरमध्ये निवृत्त होत असून, त्यानंतर त्यांच्या जागी न्यायाधीश गोगोई येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी अद्याप या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सर्व न्यायाधीशांची एकत्रित बैठक बोलावणे, असा पूर्ण न्यायालयाचा अर्थ होतो. 
 

Web Title: To call Full Courts Two Judges Demanded