मी भ्रष्टाचाराविरूद्ध लढू शकत नाही का? - मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुरादाबाद- "श्रीमंतांनी दिलेला काळा पैसा जर तुमच्या खात्यांवर तुम्ही तसाच ठेवून घेतलात तर मी त्यातून काहीतरी मार्ग काढेन," असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

"नोटाबंदीमुळे काही लोक तर गरिबांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडत आहेत. कधी कोणी श्रीमंत माणूस गरिबांच्या पाया पडताना पाहिला आहे का? मी भ्रष्टाचाराविरूद्ध लढू शकत नाही का," असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. 

ते म्हणाले, "भ्रष्टाचाराविरूद्ध लढणे हा गुन्हा आहे का.. काही लोक मी चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराविरूद्ध लढत असल्याचे का म्हणत आहेत. काही लोक तर गरीबांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडत आहेत. कधी कोणी श्रीमंत माणूस गरीबांच्या पाया पडताना पाहिला आहे?"

जे लोक त्यांचा काळा पैसा जनधन खात्यामध्ये ठेवत आहेत त्यांना गजाआड करण्याचा मार्ग मी शोधत आहे, असाही इशारा त्यांनी दिला. 
पूर्वी "मनी, मनी, मनी' म्हणत होते ते लोक आजकाल पूर्ण दिवस "मोदी, मोदी, मोदी' म्हणत आहेत, असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.

नोटाबंदीमुळे त्रास होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी घट होऊ दिली नाही. या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, 'हार्ट ऑफ एशिया'तील इतर प्रतिनिधींसोबत पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ शनिवारी रात्री भोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील तिथे उपस्थित असतील. 
 
Web Title: can i not fight against corruption, asks PM modi