पंतप्रधानांना बोलावता येणार नाही : पीएसी

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : नोटाबंदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवून बोलावले जाण्याच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तावर लोकलेखा समितीने (पीएसी) खुलासा केला आहे. पंतप्रधानांना नोटीस पाठवण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र, या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाऊ शकते, असे समितीने शुक्रवारी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना बोलावल्यानंतर संसदेची लोकलेखा समिती नरेंद्र मोदी यांनाही नोटाबंदीसंदर्भात चौकशी करण्यासाठी बोलावू शकते, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणी लोकलेखा समितीचे प्रमुख के. व्ही. थॉमस यांनीही पंतप्रधान मोदींना बोलावले जाऊ शकते असे संकेत दिले होते. मात्र, आता स्वतः पीएसीने प्रसिद्धिपत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: can not summon pm modi, clears pac