आगामी काळात कर्करोगाचा धोका 

पीटीआय
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - मागील काही वर्षांपासून देशभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 39 हजार 234 एवढी होती. ही संख्या 2013 मध्ये 40 हजार 509 आणि 2014 मध्ये 41 हजार 851 एवढी प्रचंड होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, 2020 मध्ये ती 17 लाखांच्या पुढे जाईल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. 

"आयसीएमआर'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 2012 ते 2014 या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या, आरोग्याला हानी पोचविणारी जीवनपद्धती, तंबाखू आणि तंबाखू पासून बनविलेल्या उत्पादनांचे सेवन आदी कारणांमुळे ही संख्या वाढली असल्याचे म्हटले आहे. 

गर्भाशयाच्या कर्करोगावर लस 
सुरवातीच्या काळातच होणाऱ्या तपासण्या आणि वाढती जनजागृती आदींमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. उपचारांतील मतभिन्नतेमुळे गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांवर उपचार होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगावर लस उपलब्ध असली, तरी त्याबाबत रुग्ण अनेकदा अनभिज्ञ असतात किंवा ही लस महागडी असल्यामुळे खरेदी करणे टाळतात, असे अहवालात म्हटले आहे. 

Web Title: cancer risk