"महिलांचा सुडौल बांधा राहिला नाही कारण ते विदेशी गायींचं दूध पितात"; निवडणूक प्रचारात उमेदवाराचा अजब दावा

desi and foreign cows_leoni.
desi and foreign cows_leoni.

तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) उमेदवार दिंडीगुल लिओनी यांनी महिलांसंदर्भात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. "भारतीय महिला विदेशी गायींचं दूध पित असल्याने त्यांचा बांधा सुडौल राहिलेला नाही," असा अजब दावा त्यांनी केला आहे. हे विधान केलेला त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

दिंडिगुल लिओनी हे महिलांबाबत कायमच वादग्रस्त विधानं करत असतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महिलांबाबत टिपण्णी करताना त्यांचा आकार आणि वजनाबाबत भाष्य केलं आहे. डीएमकेचा प्रचार करत असताना त्यांनी म्हटलं की, "लोक आता अधिक दूध देणाऱ्या विदेशी गायींचं दूध काढण्यासाठी गोठ्यांमध्ये यंत्राचा वापर करतात. या विदेशी गायींचं दूध महिला पित आहेत त्यामुळे त्याचं वजनही वाढत आहे. पूर्वीच्या काळी महिलांना आपल्या लहान मुलांना कंबरेवर उचलून घेता येत होतं. मात्र आता त्यांना ते जमत नाही कारण त्याचा आकार बॅऱल सारखा झाला आहे." लिओनी अशा प्रकारे भाषण करत असताना त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ते पुढे बोलतच होते. लिओनी यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भाजपच्या कला आणि संस्कृती विंगच्या अध्यक्षा गायत्री रघुराम यांनी लिओनी यांचा हा वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ शेअर करत हे लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे. महिला विदेशी गायीचं दूध पित असतील तर ते कुठलं दूध पिताहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच प्रेग्नन्सीनंतर आणि होर्मोनल चेंजेसमुळे महिलांच्या शरिरावर काय परिणाम होतो? हे तुम्हाला माहिती आहे का. तुमचा पक्ष महिलांना असाच सन्मान देते का? असा सवालही त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी एकदा असाचं विधान केलं होतं, यात त्यांनी देशी गायींना आपली 'आई' तर विदेशी गायींना आपली 'काकी' असल्याचं म्हटलं होतं. आता लिओनी यांनी अशा प्रकारचं विधान केल्यानंतर दिलीप घोष यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या साडीवरुन टिपण्णी केली होती. "आपल्या पायाला बँडेज असल्याचं दाखवण्यासाठी अशा प्रकारे कोणी साडी नेसतं का?" असं घोष यांनी म्हटलं होतं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com