पोलिस भरतीतील उमेदवारांच्या छातीवर SC, STचे शिक्के

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

धार येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी गेलेल्या उमेदवारांच्या छातीवर एससी, एसटी, ओबीसी, जनरल असे शिक्के मारण्यात आले आहेत. रुणालयातच जातीनुसार या उमेदवारांचे विभाजन करण्यात आल्याने जोरदार टीका करण्यात येत आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार येथे पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्या उमेदवाराच्या जातीचे म्हणजे एससी, एसटी व इतर असे शिक्के मारण्यात आल्याचे समोर आले आहे.

धार येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी गेलेल्या उमेदवारांच्या छातीवर एससी, एसटी, ओबीसी, जनरल असे शिक्के मारण्यात आले आहेत. रुणालयातच जातीनुसार या उमेदवारांचे विभाजन करण्यात आल्याने जोरदार टीका करण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे. माध्यमांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले.

धारचे पोलिस अधीक्षक वीरेंद्रसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात गेलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्यांच्या जातीचे शिक्के मारण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

Web Title: Candidates marked SC,ST on their chest during police recruitment drive in Madhya Pradesh