राजस्थानमध्ये पोलिस कॉन्स्टेबलसाठी तब्बल एवढे उमेदवार

पीटीआय
रविवार, 15 जुलै 2018

राजस्थानमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी सुमारे 15 लाख उमेदवार सहभागी झाले आहेत. हा परीक्षा दोन पाळ्यांमध्ये होत असून रविवारपर्यंत (ता. 15) चालेल. या काळात मोबाईलवरील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

जयपूर - राजस्थानमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी सुमारे 15 लाख उमेदवार सहभागी झाले आहेत. हा परीक्षा दोन पाळ्यांमध्ये होत असून रविवारपर्यंत (ता. 15) चालेल. या काळात मोबाईलवरील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी 15 लाख उमेदवार आले असून, 664 परीक्षा केंद्रे आहेत. त्यातील 209 जयपूर जिल्ह्यात आहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था उभारली असल्याचे पोलिस महानिरीक्षक (भरती) प्रकाश माथुर यांनी आज सांगितले. पोलिस विभागातर्फे राज्यात दुसऱ्यांदा भरती परीक्षा घेण्यात येत आहे. पोलिस कॉन्स्टेबलच्या 13 हजार 143 जागांसाठी ही परीक्षा होत आहे. 

Web Title: candidates for the police constable post in rajasthan