कॅनडाच्या मंत्र्यांना भेटण्यास अमरिंदरसिंग यांचा नकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

चंदिगढ - खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थक असलेले कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांना भेटण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नकार दिला आहे. 

एका मुलाखातीदरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरजीत सज्जन खलिस्तानवादी असल्याने त्यांच्याशी भेटणार नसल्याचे सांगितले. कॅनडाच्या मंत्रीमंडळात पाच खलिस्तानवादी मंत्री आहेत व त्यांच्यामुळेच कॅनडा सरकारने पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान कॅनडामध्ये प्रचारास परवानगी नाकारल्याचेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

हरजीत सज्जन हे कॅनडाचे पहिले भारतीय संरक्षण मंत्री असून संरक्षण मंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर प्रथमच ते भारत भेटीवर येणार आहेत.

Web Title: Captain Amarinder Singh refused to meet Canadian defence minister