Coronavirus : 'माँ तुझे सलाम'; इटलीतील भारतीयांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी 'मर्दानी पायलट'!

टीम ई-सकाळ
सोमवार, 23 मार्च 2020

गेल्या १५ वर्षांपासून ती हे काम चोखपणे बजावत आहे. आणि आता तिने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या कुटुंबीयांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Coronavirus : नवी दिल्ली : सध्या जिकडेतिकडे फक्त कोरोनाचीच चर्चा सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, कोरोनाने घेतला आणखी एक बळी वगैरे वगैरे... मात्र, कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांविषयी आपणाला जास्त माहिती मिळत नाही. अनेक वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी किंवा इतर अनेकजण आपला जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोनाने इटलीला पूर्णपणे आपल्या विळख्यात ओढले आहे. कोरोनामुळे इटलीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही एअर इंडियाची एक महिला पायलटही आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहे. इटलीमधील भारतीयांना आपल्या घरी सुरक्षित घेऊन येण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. कोरोना व्हायरस प्रभावित भागात जाऊन काम करण्याचा धोका तिने पत्करला आहे. त्यामुळेच या महिला पायलटची सध्या चर्चा सुरू झाली आहे. कोण आहे ही महिला पायलट?

Image may contain: aeroplane

- Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; रूग्णाची संख्या...

तिचं नाव आहे कॅप्टन स्वाती रावल. एअर इंडियाची पायलट म्हणून ती भारत-इटली विमानाचे सध्या सारथ्य करत आहे. एखाद्याचा मुलगा, मुलगी, पती, पत्नी, आई, वडील, भाऊ आणि बहीण या सर्वांना ती कोरोनाने अक्षरश: झपाटलेल्या इटलीमधून भारतात घेऊन येत आहे. इटली ज्या देशात हल्ली जायला भलेभले धजावताना दिसत नाहीत, त्या देशामधून एअर इंडियाच्या बोईंग ७७७ विमानातून तिने २६३ भारतीयांना मायदेशी आणले. 

- लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी

स्वाती स्वत: एका ५ वर्षाच्या मुलीची आई असून तिने दाखवलेल्या धाडसाचे सध्या लोक कौतुक करत आहेत. स्वातीला फायटर पायलट व्हायचे होते. मात्र, त्यावेळी भारतीय हवाई दलात महिला फायटर पायलटला परवानगी नाकारली जात होती. मात्र, निराश न होता तिने शेवटी व्यावसायिक पायलट होण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या १५ वर्षांपासून ती हे काम चोखपणे बजावत आहे. आणि आता तिने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या कुटुंबीयांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Image may contain: one or more people

- कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captain Swati Rawal who brought our people home safely from Coronavirus affected Italy