नोकरदार महिलांना करिअरची चिंता

दहा देशांमधील पाच हजार नोकरदार महिलांशी संवाद साधण्यात आला. कोरोना साथीचा कामावर परिणाम आणि कामाच्या ठिकाणी लिंग समानता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली.
Mishel Parmili
Mishel ParmiliSakal

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) जागतिक साथीत नोकरदार महिलांना (Working Women) कंपनीचालक कसा पाठिंबा देतात आणि त्यांच्यात विश्‍वास निर्माण करण्यात करण्यासाठी ते काय करतात, याची पाहणी जागतिक पातळीवर केली असता ५१ टक्के महिला त्यांच्या करिअरच्या (Career) भवितव्याबाबत (Future) कमी आशावादी असल्याचे दिसले. हा बदल कोरोनापूर्वीच्या काळापेक्षा प्रकर्षाने आढळल्याची नोंद डेलॉईट ग्लोबल या कंपनीने केली आहे. (Career Concerns for Working Women)

या पाहणीसाठी दहा देशांमधील पाच हजार नोकरदार महिलांशी संवाद साधण्यात आला. कोरोना साथीचा कामावर परिणाम आणि कामाच्या ठिकाणी लिंग समानता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली. यातील सहभागी महिला या विविध वयोगटातील होत्या. या सर्व्हेतील माहितीचे वंश, परंपरावाद, लैंगिक कल, लिंग ओळख आदी विविध पातळीवर विश्लेषण करणे शक्य झाले, असे ‘डेलॉईट ग्लोबल’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल परमिली यांनी सांगितले.

Mishel Parmili
कानपूरमध्ये भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून घर व करिअर अशा दोन्ही पातळींवरील जबाबदारीत वाढ झाल्याने जास्त ताण पडत असून निराशा जाणवत असल्याचे मत या महिलांनी व्यक्त केले. कार्यस्थळी कंपनीच्या चालकांकडून आवश्‍यक पाठबळ मिळत नसल्याने अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. करिअरवरील नकारात्मक परिणामाची चिंता न वाटता महिलांना आरामात व मोकळेपणाने काम करता यावे, यासाठी विश्‍वासार्ह वातावरण निर्मिती खूप कमी चालक करतात, असेही महिलांनी सांगितले.

जागतिक साथ आणि या संकटामुळे महिलांवर पडणाऱ्या व्यापक दबावाची कंपनीकडून फारशी दखल घेतली जात नसल्याने अनेक जणींना दुसरी नोकरी शोधण्याचा किंवा नोकरी सोडून देण्याचा विचार करणे भाग पडत आहे. अशा काळात महिला नोकरदारांना अपेक्षित बदल आणि त्यांच्या गरजा जाणून घेणे कंपनीचालकांसाठीही कठीण ठरत आहे.

Mishel Parmili
तिसरी लाट मुलांसाठी किती घातक? एम्सचे संचालक म्हणतात...

कोरोनाकाळातील नोकरदार महिलांची स्थिती

  • घराची व कामाची जबाबदारी वाढली

  • कंपनीचालकांकडून फारसे सहकार्य नाही

  • ऑफिसच्या कामाचा ताण वाढला

  • घरकामाचा बोजाही वाढला

  • मुलांना सांभाळण्याची जबाबदारी

  • शारीरिक, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष

  • करिअरबद्दल महत्वाकांक्षाकेवर पाणी फिरण्याची वेळ

कोरोनाच्या साथीमुळे नोकरदार महिलांवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्याची गरज या सर्व्हेत अनेक जणींनी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीत बदल करताना महिला कर्मचाऱ्यांना आवश्‍यक समर्थन देण्याकडे कंपनीने लक्ष पुरवायला हवे.

- मिशेल परमिली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेलॉईट ग्लोबल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com