1 डिसेंबरपासून टोलनाक्यावर मिळणार कॅशबॅकसह अनेक फायदे, कसे काय?

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

फास्टॅग हे एक प्रकारचे कार्ड असणार आहे. जे गाडीवर लावल्यावर तुम्हाला टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. टोलनाका क्रॉस करताना तुमचे कार्ड आपोआप स्कॅन होईल आणि तुमच्या खात्यातून टोलची रक्कम वसूल केली जाईल. या फास्टॅगमुळे तुम्हाला टोलच्या गर्दीत थांबावे लागणार नाही.

नवी दिल्ली : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रस्तेवाहतूक व दळणवळण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एक डिसेंबरपासून देशातील सर्व वाहनांवर फास्टॅग (Fastag) लावणे अनिवार्य केले आहे. या फास्टॅगच्या वापरामुळे नागरिकांना अनेक ऑफर्स मिळणार आहेत. एक डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. या फास्टॅगच्या साहाय्याने टोलनाक्यावर टोल वसूल केला जाणार आहे. सध्या देशातील 400 टोलनाक्यांवर फास्टॅगच्या साहाय्याने टोलवसूली केली जाते. मात्र, आता सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य केले जाणार आहे. 

काय आहे फास्टॅग
फास्टॅग हे एक प्रकारचे कार्ड असणार आहे. जे गाडीवर लावल्यावर तुम्हाला टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. टोलनाका क्रॉस करताना तुमचे कार्ड आपोआप स्कॅन होईल आणि तुमच्या खात्यातून टोलची रक्कम वसूल केली जाईल. या फास्टॅगमुळे तुम्हाला टोलच्या गर्दीत थांबावे लागणार नाही.

फास्टॅगचे फायदे
1. फास्टॅगच्या वापरामुळे सर्वांच्या वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. 
2.या फास्टॅगला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग किंवा मोबाईल बॅंकिंगसह रिचार्ज करता येणार आहे. 
3.अनेक बॅंक या फास्टॅगवर चांगल्या ऑफर देत आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांसाठी या फास्टॅगवर 2.5 टक्के कॅशबॅकसुद्धा मिळत आहे.
4. काही बॅंक या फास्टॅगवर एक लाखापर्यंतचा अपघाती विमाही पुरवत आहेत. हा विमा वाहनचालकासाठी उपलब्ध आहे. 
5. फास्टॅग लावून जेव्हा एखादी गाडी टोलनाक्यावरून जाईल तेव्हा वाहनचालकाला टोल वसूल झाल्याचा मेसेज आणि ई-मेलही येईल. युझर्सला फास्टॅग लॉगइन पोर्टलवरही टोल वसूलीची माहिती मिळू शकते. 

Image result for national highway toll plaza hd images

कसे मिळणार फास्टॅग?
नवीन गाडी खरेदी करतानाच तुम्हाला हे फास्टॅग डिलरकडून घेता येईल. जुन्या गाड्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट ऑफ सेलमधून फास्टॅग विकत घेत येऊ शकते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संलग्न असलेल्या खासगी बॅंकांमधूनही फास्टॅग विकत घेता येऊ शकते. सिंडिकेट बॅंक, ऍक्सिस बॅंक, IDFC बॅंक, HDFCबॅंक, ICICIबॅंक, SBIबॅंक या सर्व बॅंकांमध्येही फास्टॅग मिळू शकते. तसेच Paytmवरही फास्टॅग उपलब्ध आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cars owners to get cashback and many more offers on Fastag from december 1 on national highway