...म्हणून भाजपच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

- कैलास विजयवर्गीयांसह 350 जणांविरुद्ध गुन्हा 

- इंदूरमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन 

इंदूर  : भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह 350 कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदूर शहरात गुन्हा दाखल झाला आहे. इंदूरमध्ये एका आंदोलनादरम्यान भाजप नेत्यासह अन्य मंडळी एका अधिकाऱ्यास धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये कैलास विजयवर्गीय हे आमच्या संघाचे नेते शहरात आहेत; अन्यथा आज आग लावली असती, असे म्हणताना दिसतात. भाजप नेत्याचा हा व्हिडिओ सर्वत्र पसरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे अन्य ज्येष्ठ नेते इंदूरमध्ये गुरुवारपासून आहेत. या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेश पोलिस भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भाजपने स्थानिक अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले होते. कैलास विजयवर्गीय आणि कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आणि त्यांना भेटण्याची वेळ मागितली. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही.

Image result for vijayvargiya

विजयवर्गीय यांनी म्हटले की, अधिकारी शहरात आहेत की बाहेर, हे सांगण्याचे सौजन्य नाही का? आम्ही हे सहन करणार नाही. आमचे संघाचे नेते शहरात आहेत; अन्यथा इंदूरमध्ये आग लावली असती. हे वक्तव्य व्हिडिओत बंदिस्त झाले असून, ते व्हायरल झाले आहे. तहसीलदाराने दिलेल्या तक्रारीवरून कैलास विजयवर्गीय आणि खासदार शंकर लालवानी यांच्यासह 350 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती संयोगिता गंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्रसिंह रघुवंशी यांनी सांगितले. 

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against Kailash Vijayvargiya and others for violating prohibitory orders