Crime News : भाजपचे निलंबीत आमदार टी. राजा यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा; कारण...

bjp mla t raja
bjp mla t raja

मुंबई : भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. टी राजा सिंह यांच्यावर 29 जानेवारी 2023 रोजी मुंबईत सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.

bjp mla t raja
Kapil Sibal tweet: हेट स्पीच कधी थांबणार ? सुप्रीम कोर्टाला सिब्बल म्हणतात तुम्ही तर चंद्र मागताय

मिळालेल्या माहितीनुसार, दादर पोलिसांनी टी राजाविरुद्ध 27 मार्च रोजी आयपीसी कलम 153 ए 1 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 29 जानेवारीला दादरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला होता. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. लव्ह जिहाद आणि लँड जिहादला मुद्दा बनवत मोर्चात घोषणा देण्यात आल्या. या बैठकीत टी राजा सिंह यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी प्रक्षोभक भाषण देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, त्याच्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. ज्यामध्ये ते मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एका जाहीर सभेत सिंह यांच्या भाषणाचा होता.

bjp mla t raja
Karnataka CM: शिवकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेची अडचण नाही, पण CM पदासाठी...; सिद्धरामय्यांचा दावा

यावेळी सिंह म्हणाले होते की, जो कोणी हिंदूंच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. मुस्लिम नमाज अदा करत असल्याच्या संदर्भात ते म्हणाले, "हिंदू राष्ट्रात तुम्हाला नमाज अदा करण्यासाठी लाऊडस्पीकर देखील मिळणार नाहीत. सिंह म्हणाले होते की 2026 पर्यंत भारत "संयुक्त हिंदू राष्ट्र" घोषित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com