अपात्र आमदारांचे प्रकरण; सुनावणीसाठी न्यायधीशाची नियुक्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

नवी दिल्ली : अण्णा द्रमुकच्या 18 आमदारांना अपात्र ठरवण्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एम. सत्यनारायण यांची नियुक्ती केली आहे. 

नवी दिल्ली : अण्णा द्रमुकच्या 18 आमदारांना अपात्र ठरवण्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एम. सत्यनारायण यांची नियुक्ती केली आहे. 

अण्णा द्रमुकच्या 18 आमदारांना अपात्र ठरवल्या प्रकरणाचा खटला उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नेण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सत्यनारायण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी नियुक्ती केली. न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या सुटीकालीन पीठासमोर ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी याचिका दाखल केली. मात्र, ती याचिका फेटाळून लावली.

Web Title: Case of ineligible MLAs Judge Appointment for Hearing