चिदंबरम यांच्या घरातून पैसे आणि दागिन्यांची चोरी

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिदंबरम यांच्या घरातून दीड लाख रुपयांची रोकड आणि साधारण एक लाखांपर्यंतच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. नुकतीच ही घटना समोर आली असून, त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त असूनही चोरी झाल्याने नोकरांनीच हे कृत्य केल्याची शक्यता आहे.

चेन्नई : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या चेन्ऩईतील घरातून पैसे व दागिन्यांची चोऱी झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिदंबरम यांच्या घरातून दीड लाख रुपयांची रोकड आणि साधारण एक लाखांपर्यंतच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. नुकतीच ही घटना समोर आली असून, त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त असूनही चोरी झाल्याने नोकरांनीच हे कृत्य केल्याची शक्यता आहे.

चिदंबरम यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली असून, त्यानुसार तपास करण्यात येत आहे. या परिसरात चोरीची ही पहिलीच घटना नसून, गेल्या आठवड्यात सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातही चोरी झाली होती. त्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: cash and jewelry were stolen from the house of congress leader P Chidambaram