देशात कॅशलेस व्यवहार शक्‍य नाही- नितीश

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पाटणा : भारतासारख्या देशात कॅशलेस इकॉनॉमी शक्‍य नसल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज व्यक्त केले. नोटाबंदीमुळे काळे धनही थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील बहुतांश काळा पैसा हा दारूसारख्या अवैध धंद्यांत असल्यामुळे संपूर्ण देशात दारूबंदी लागू केली पाहिजे, असे विधान त्यांनी केले.

काळ्या पैशाविरुद्ध एकत्रितपणे लढायला हवे, बेहिशेबी संपत्ती, हिरे, दागिने आदी संपत्तीवरदेखील कारवाई करायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. आपण जसजसे विकसित होत जाऊ तस तसे रोख रकमेचे चलन कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्येही कॅशलेसचे प्रमाण 40 ते 45 टक्‍क्‍यांहून अधिक नसल्याची माहिती देत त्यांनी 30 डिसेंबरनंतर नोटाबंदीच्या प्रभावाचे विश्‍लेषण करता येईल, असे म्हटले आहे.

राजकीय पक्षांच्या बेहिशेबी देणग्यांवरील निवडणूक आयोगाच्या सूचनेचे त्यांनी या वेळी समर्थन केले. दोन हजारच नव्हे, तर एक रुपयाचीदेखील जास्त देणगी दिल्यास देणाऱ्याचे नाव सांगितले जावे, असे त्यांनी सांगितले. देशातील न्याय परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी न्यायाधीशांच्या रिक्त पदे न भरणे हे अयोग्य असल्याचे सांगितले. तसेच सध्या आम्ही कालचक्र म्हणजे प्रकाश उत्सवाचे योग्य आयोजन करण्याकडे लक्ष देणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

Web Title: cashless transactions not possible in country