Crime News | १५ जणांनी राहत्या घरातून केलं महिलेचं अपहरण; थरारक प्रसंग CCTV मध्ये कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamilnadu Woman kidnapped

१५ जणांनी राहत्या घरातून केलं महिलेचं अपहरण; थरारक प्रसंग CCTV मध्ये कैद

तामिळनाडूतील मायिलादुथुराई येथे मंगळवारी रात्री एका महिलेचं तिच्या राहत्या १५ पुरुषांनी अपहरण केलं. १५ जण तिच्या घराचं पुढचं गेट तोडून घरात घुसतानाची चित्रं जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आरोपींना पकडण्यात आलं आहे आणि त्याच रात्री पोलिसांनी महिलेची सुटका केली.

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असे दिसून आलं की, आरोपींपैकी एक विघ्नेश्‍वरन (३४) या महिलेशी मैत्री करत होता आणि तिचा पाठलाग करू लागला. महिलेनं विघ्नेश्‍वरनची तक्रार मायलादुथुराई पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्याला ताकीद दिली, त्याच्याकडून लेखी जबाब घेतला आणि नंतर सोडून दिलं.

हेही वाचा: अपहरण केलेल्या १३ तरुणींची,आठ बालकामगारांची मुक्तता

विघ्नेश्‍वरनने १२ जुलै रोजी महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण ती पळून गेली आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी विघ्नेश्वरन आणि त्याच्या १४ साथीदारांनी महिलेच्या घरात घुसून तिचं अपहरण केलं. तसंच तिच्या कुटुंबीयांना शस्त्रांचा धाकही दाखवला.

हेही वाचा: पुणे: सलून कामगाराचा ३८ वेळा चाकूने भोसकून खून; भावानेच केलं ठार

मायलादुथुराई पोलिसांनी तात्काळ शोध पथक तयार केलं आणि कारचा माग काढला. त्यानंतर पथकाने विघ्नेश्‍वरन आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करून महिलेची सुटका केली.

Web Title: Caught On Cam Woman Kidnapped By 15 Men In Tns Mayiladuthurai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..