CBI | मोठा भ्रष्टाचार! पुण्यातील बँकेच्या अधिकाऱ्याला CBI कडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cbi

मोठा भ्रष्टाचार! पुण्यातील बँकेच्या अधिकाऱ्याला CBI कडून अटक

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पुण्याशी संबंधित एका बँकेतील अधिकाऱ्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादमधील रत्नाकर बँक लिमिटेडच्या कृषी विभाग प्रमुखांचा या प्रकरणात संबंध होता, असं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले. त्यांच्यासह पुण्यातील एका बँकेच्या वसुली प्रमुखालाही सीबीआयने अटक केली आहे. जवळपास 30 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सीबीआयचं म्हणणं आहे की, त्यांनी रत्नाकर बँक लिमिटेड, अहमदाबादचे कृषी विभागातील प्रादेशिक प्रमुख आणि पुण्यातील बँकेच्या वसुली प्रमुखाला 30 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. यासंदर्भात एनआयए वृत्तसंस्थेने माहिती दिलीय.

loading image
go to top