'सीबीआय'कडून 'एफआयआर' दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या "एअर इंडिया' या विमान वाहतूक कंपनीमध्ये 2011 साली झालेल्या सॉफ्टवेअर खरेदीतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज कंपनीचे अज्ञात अधिकारी, जर्मन फर्म 'एसएपी, एजी' आणि संगणक क्षेत्रातील आघाडीची कंपनी "आयबीएम' विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या सॉफ्टवेअर खरेदी प्रक्रियेमध्ये 225 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या सॉफ्टवेअर खरेदीमध्ये प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते, असे केंद्रीय दक्षता आयोगाने सांगताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.

या सॉफ्टवेअर खरेदीच्या निविदा काढताना आणि हे कंत्राट देताना झालेली अनियमितता, तसेच "एसएपी' आणि "आयबीएम' या कंपन्यांना झालेल्या आर्थिक लाभाची चौकशी केली जावी, असे निर्देश दक्षता आयोगाने "सीबीआय'ला दिले आहेत. सरकारी यंत्रणेतील नेमक्‍या कोणत्या व्यक्तीने "आयबीएम'सोबत व्यवहार केला होता आणि तिला नेमका किती आर्थिक फायदा झाला हे शोधून काढा, असेही दक्षता आयोगाने म्हटले आहे. गुन्हेगारी कटकारस्थान आणि फसवणुकीच्या विविध कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: cbi files fir in scam in air india