मेहुल चोक्सीविरुद्ध आणखी एक गुन्हा; २२ कोटींची फसवणुक उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mehul choksi

मेहुल चोक्सीविरुद्ध आणखी एक गुन्हा; २२ कोटींची फसवणुक उघड

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याच्या कंपनी गीतांजली जेम्सवर आपली पकड घट्ट केली आहे. एका रिपोर्टनुसार सीबीआयने चोक्सीविरुद्ध २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यांने केलेल्या फसवणुकीचे हे प्रकरण 2014-18 मधील असल्याचे सांगण्यात आले.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीसांगितले की, मेहुल चोक्सी यांनी त्याचा पुतण्या नीरव मोदीच्या सोबत १३,५०० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात हवा असलेला मेहुल चोक्सी ने आयएफसीआचे २५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी हिरे आणि दागिने गाहाण ठेवले होते त्यांची किंमत कथिरित्या वाढवून दाखवली. एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले की मेहुल चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि व्हॅल्युअर्स सूरजमल लल्लू भाई अँड कंपनी, नरेंद्र झवेरी, प्रदीप सी शाह आणि श्रेनिक शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IFCI) लिमिटेडच्या तक्रारीवरून केंद्रीय एजन्सीने चोक्सीवर ही कारवाई केली आहे. IFCI ने आरोप केला आहे की चोक्सीने २०१६ मध्ये २५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते ज्यासाठी त्याने शेअर्स आणि सोने आणि हिऱ्यांचे दागिने तारण ठेवले होते. चार वेगवेगळ्या मूल्यमापन करणाऱ्यांनी सांगितले की तारण ठेवलेल्या दागिन्यांची किंमत ३४ ते ४५ कोटी रुपयांच्या मध्ये आहे.

IFCI ने तारण ठेवलेल्या शेअर्स आणि दागिन्यांमधून वसुली केली तेव्हा असे आढळून आले की तारण ठेवलेले सोने, हिरे आणि रत्नांचे दागिने सुरुवातीच्या मूल्यांकनापेक्षा ९८ टक्के कमी होते. तारण ठेवलेल्या दागिन्यांची किंमत ७० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत असल्याचे ताज्या मूल्यांकनातून समोर आले आहे.

हेही वाचा: नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती

Web Title: Cbi Has Registered A Fresh Case Against Fugitive Diamantaire Mehul Choksi Know Detail Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top