CBI inquiry : लो फ्लोअर बस खरेदीप्रकरणी सीबीआय चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI inquiry in bus purchase case Corruption in procurement of low floor buses

CBI inquiry : लो फ्लोअर बस खरेदीप्रकरणी सीबीआय चौकशी

नवी दिल्ली : लो फ्लोअर बसच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिल्ली सरकारवर करण्यात येत आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) चौकशीस नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. दिल्ली परिवहन निगमचे (डीटीसी) मुख्य सचिव नरेश कुमार यांनी याबाबत नऊ जून रोजी तक्रार दाखल केली होती. निविदा काढणे, खरेदी आणि दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टीमच्या अध्यक्षांची नियुक्ती यात परिवहन मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्यावर्षीही असे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर ही बस खरेदीची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) नायब राज्यपालांवर टीका केली आहे.बस खरेदीबाबत भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी पहिल्यांदा आरोप केले होते. ``जुलै २०१९मध्ये दिल्ली सरकारने एक हजार लो फ्लोअर बसची खरेदी आणि त्यांच्या देखभालीसाठी कंत्राट दिले गेले. त्यात पाच हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. ज्या कंपनीकडून बस खरेदी केल्या, त्यांनाच देखभालीचे कंत्राट दिले गेले. बस रस्त्यावर आल्याआल्या देखभालीचे कंत्राट सुरू झाले. वास्तविकतः नव्या बसची तीन वर्षांची वॉरेंटी असायला हवी होती,`` असे गुप्ता यांनी म्हटले होते.

तत्कालीन नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या आदेशानुसार याप्रकरणी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने वार्षिक देखभाल करारात त्रुटी असल्याचे नमूद केले होते आणि हा करार रद्द करण्याची शिफारस केली होती.

अशा बसची खरेदीच झाली नाही, त्याबाबतचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. दिल्लीला जास्त शिकलेल्या नायब राज्यपालांची गरज आहे. कशावर स्वाक्षरी करत आहोत, हे सध्याच्या नायब राज्यपालांना कळत नाहीये.

- ‘आप’ची प्रतिक्रिया

Web Title: Cbi Inquiry In Bus Purchase Case Corruption In Procurement Of Low Floor Buses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..