कार्तींच्या जामिनाविरुद्ध सीबीआय सुप्रीम कोर्टात

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

आयएनएक्‍स मीडियाप्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. कार्ती चिदंबरम यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने 31 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना कार्ती यांच्या अटकेला 3 जुलैपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. आता सीबीआयने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

नवी दिल्ली: आयएनएक्‍स मीडियाप्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. कार्ती चिदंबरम यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने 31 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना कार्ती यांच्या अटकेला 3 जुलैपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. आता सीबीआयने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

सीबीआयने एक जून रोजी या प्रकरणी चौकशीसाठी कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध समन्स बजावले होते आणि दुसऱ्या दिवशी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर कॉंग्रेस नेत्यानी या नोटीशीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर कार्ती 6 जून रोजी सीबीआयसमोर हजर झाले होते. दरम्यान, कार्ती चिदंबरम यांना 2007 मध्ये आयएनएक्‍स मीडियाला ॅरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी)ची मंजुरी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून 28 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. 

Web Title: CBI moves Supreme Court challenging bail granted to Karti Chidambaram