सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची CBI चौकशी करा; मुलीची आग्रही मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashodhara Phogat

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची CBI चौकशी करा; मुलीची आग्रही मागणी

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या आकस्मात मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची मुलगी यशोधरा फोगाट हीन केली आहे. सध्या गोवा पोलिसांकडून सुरु असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीवर कुटुंबीय समाधानी नसल्याचं तिनं म्हटलं आहे. (CBI probe into Sonali Phogat death case demanded by Sonali Phogat dughter)

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीचं आश्वासनं दिलं आहे, असंही यशोधरा हीनं सांगितलं आहे. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी २७ ऑगस्ट रोजी CM खट्टर यांची भेट घेतली होती. यानंतर जर फोगाट यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तर तसे निर्देश आम्ही देऊ असं म्हटलं होतं.

हेही वाचा: अनिल देशमुखांनी PMLA कोर्टात स्वतः मांडली बाजू; उपचारांबाबत केली महत्वाची मागणी

दरम्यान, अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सोनाली यांच्या मुलीनं केला आहे. आरोपीला गोव्यात ठेवण्यात आलं असून त्यांचा या हत्येमागचा हेतू काय होता हे अद्याप आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. मग पोलीस नक्की काय करताहेत? माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्व सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही.

आईच्या मृत्यूचा सुनियोजित कट

आपल्या आईचा मृत्यू हा सुनियोजित कट होता असा आरोपही यशोधरा फोगाट हीनं केला आहे. माझ्या आईनं मला सांगितलं होतं की, गोव्यात माझं शुटिंग एक आठवड्यासाठी असेल. पण रिसॉर्ट केवळ दोनच दिवसांसाठी बुक करण्यात आलं होतं. यावरुन हे स्पष्ट होतं की, हा सुनियोजित कट होता.

Web Title: Cbi Probe Into Sonali Phogat Death Case Demanded By Sonali Phogat Dughter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HaryanaGoaDesh news