जयललितांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

दरम्यान, तमिळनाडू तेलगू युवा शक्तीतर्फेही याच आठवड्यात अशाच प्रकारची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये जयललितांचा आरोग्यविषयक अहवाल आणि मृत्यूबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेल्या खासदार शशिकला पुष्पा यांनी केली.

पुष्पा यांनी दाखल केलेल्या याचिकेत जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत त्यांची वैद्यकीय स्थिती कुणालाच सांगण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. कुणालाही त्यांना भेटू दिले जात नव्हते तसेच त्यांच्या अंत्यविधीवेळीच्या छायाचित्रावरून मृतदेह बराच काळ जतन करून ठेवल्याचे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तमिळनाडू सरकार आणि अपोलो हॉस्पिटलला जयललितांच्या आरोग्य अहवालांची आणि केलेल्या उपचारांची सविस्तर माहिती देण्यासंदर्भात केंद्राने दिशा-निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, तमिळनाडू तेलगू युवा शक्तीतर्फेही याच आठवड्यात अशाच प्रकारची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये जयललितांचा आरोग्यविषयक अहवाल आणि मृत्यूबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

Web Title: CBI probe into Jayalalithaa's 'mysterious death'