लालूंच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

2006 मध्ये रेल्वे हॉटेल टेंडरप्रकरणी सीबीआयने लालूंसह राबडीदेवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 420 आणि 120 बी याअंतर्गत गुन्हा दाखल केला. 

पटणा : राज्यात 'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर प्रंचड तेढ निर्माण झाला असताना आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे हॉटेलच्या टेंडरप्रकरणी लालूप्रसाद यांच्या पटणा येथील निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) छापेमारीची कारवाई करण्यात आली. माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्यासमोर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.

CBI

रेल्वे हॉटेलच्या टेंडरप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई करण्यात आली. या छापेमारीच्या कारवाईदरम्यान राबडीदेवी आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. 2006 मध्ये रेल्वे हॉटेल टेंडरप्रकरणी सीबीआयने लालूंसह राबडीदेवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 420 आणि 120 बी याअंतर्गत गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, चारा गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी खासगी कंपनीला फायदा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले असा आरोप केला जात आहे. त्यावरूनच देशभरातील 12 ठिकाणांवर सीबीआयकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली होती.

Web Title: CBI Raid Rabri Patna Residence Son Tejashwi Yadav Questioned Under Railway Tender Case