सीबीआयचे बिहारमध्ये छापासत्र

उज्ज्वलकुमार
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पाटणा : बिहारमधील निवारागृहांतील गैरप्रकारांसदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज छापे घातले. पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि मोतीहारीतील दहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा, या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि तीन पत्रकारांच्या निवासस्थानी हे छापे घालण्यात आले. 

सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी आज सकाळपासून ही कारवाई सुरू केली आणि ती दिवसभर सुरू होती. या छाप्यांमध्ये सीबीआयच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे आले असून, त्यामुळे अनेक प्रतिष्ठित आणि नोकरशहा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. मंजू वर्मा यांच्या पाटण्यातील निवासस्थानासह त्यांच्या बेगुसरायमधील मालमत्तांवरही सीबीआयने छापे घातले. सकाळी साडेसात वाजता तपास पथक पाटण्यातील मंजू वर्मा यांच्या 12, स्टॅंड रोड येथील निवासस्थानी पोहोचले होते. दुसऱ्या पथकाने ब्रजेश ठाकूरचे नातेवाईक रितेश अनुपम आणि मनोज कुमार यांच्या निवासस्थानी छापे घातले. पोलिस आणि सीबीआयच्या रडारवर असलेल्या सुमन शाही यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला. ठाकूरच्या दैनिकाच्या कार्यालयातही कारवाई झाली. 

निवारागृहांतील मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड झाल्यावर सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. ब्रजेश ठाकूरला पैसा पुरविणाऱ्या नेत्यांचा आता शोध घेतला जातो आहे. पैसे मिळाल्यावर निवारागृहांतील मुलींना या नेत्यांच्या "सेवे'साठी पाठविले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. निवारागृहांची नियमित तपासणी करण्याच्या नियमाला बगल का दिली गेली, याचा तपासही सीबीआय करणार आहे. 

मुलांवरही अत्याचार 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. राज्यभरातील निवारागृहांच्या ऑडिटची माहिती त्यात आहे. त्यातील माहितीनुसार, निवारागृहांत मुलींवर अत्याचार होत होतेच; पण मुलांनाही त्याचा सामना करावा लागतो. या अहवालानुसार, बिहारच्या 38 जिल्ह्यांतील 110 निवारागृहांची तपासणी करण्यात आली आहे. 

Web Title: CBI Raids in Bihar