सीबीएसई बोर्ड; 10 वीची परीक्षा पुन्हा सुरू होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये दहावीची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.

या महिन्याअखेरीस बोर्डाची बैठक पार पडणार असून, त्यात याबाबतचा ठराव संमत केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण अधिकार कायद्यातील (आरटीई) दुरुस्तीसंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मांडलेल्या प्रस्तावास कायदे मंत्रालयाची मान्यता मिळाली असून, येत्या आठवडाभरात यावर मंत्रिमंडळाची चर्चा होईल. सीबीएसई बोर्डाच्या बैठकीत संबंधित ठराव पास होऊन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून 10 वीची परीक्षा सर्वांसाठी अनिवार्य होतील, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

Web Title: CBSE board exam to be resumed