'सीबीएसई' पेपरफुटीप्रकरणी कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

केंद्रीय माध्यमिक मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी गणित आणि बारावी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी आणखी सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी गणित आणि बारावी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी आणखी सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले. यामध्ये समावेश असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली असून, चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यापूर्वी पेपरफुटीप्रकरणात काल (शुक्रवार) 12 जणांचा समावेश असल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह इतर 12 जणांचा समावेश असल्याचे समोर आले होते. या सर्वांना झारखंडच्या चतरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. बारावी अर्थशास्त्र आणि दहावी गणित विषयाचे पेपर मागील आठवड्यात फुटल्याचे समोर आल्यानंतर सीबीएसई बोर्डावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती.  

दरम्यान, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला नवज्योत विद्यालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच यातील दोन विद्यार्थी पटना येथील आहेत. तसेच सध्या खासगी कोचिंग क्लासेसचे दोन संचालक अटकेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: CBSE Board Exam Paper Leak Private Coaching Classes Two Directors Arrested