प्रथम क्रमांकावर तीन मुली सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल लागला असून, यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. देशात चार विद्यार्थी पहिले आले असून त्यापैकी तीन मुली आहेत. 

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल लागला असून, यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.

देशात चार विद्यार्थी पहिले आले असून त्यापैकी तीन मुली आहेत. 
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 86.70 टक्के आहे. यापैकी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88.67 टक्के असून, 85.32 टक्के मुले यशस्वी झाली आहेत. प्रखर मित्तल (गुरगाव), रिमझिम अगरवाल (बिजनोर), नंदिनी गर्ग (शामली, उत्तर प्रदेश) आणि श्रीलक्ष्मी जी. (कोची) हे विद्यार्थी पहिले आले असून, त्यांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील सात विद्यार्थ्यांना 498, तर तिसऱ्या क्रमांकावरील 14 विद्यार्थ्यांना 497 गुण मिळाले आहेत. देशात तिरुअनंतपुरम (उत्तीर्णांचे प्रमाण 99.60 टक्के) विभाग प्रथम क्रमांकावर असून, त्याखालोखाल चेन्नई (97.37 टक्के) आणि अजमेर (91.86 टक्के) या विभागांचा क्रमांक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का पांडा (गुरगाव) आणि सानिया गांधी (गाझियाबाद) या विद्यार्थीनी प्रथम आल्या असून त्यांना 92.55 टक्के गुण मिळाले. 

उत्तीर्णांची टक्केवारी 
95 टक्‍क्‍यांहून अधिक गुण : 27,426 विद्यार्थी 
90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण : 1,31,493 विद्यार्थी 

Web Title: CBSE Class 10 results announced