‘सीबीएसई’ची परीक्षा १ जुलैपासून; उर्वरित विषयांचे वेळापत्रक जाहीर

exam
exam

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी व दहावीच्या उर्वरित २९ विषयांची परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान होईल, असे सोमवारी जाहीर करण्यात आले. परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आदी अटींचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षार्थी पाल्य आाजारी नाही याची खात्री पालकांनी द्यायची असल्याचे मंडळाच्या सूचनेत म्हटले आहे. ‘आरोग्य सेतू’ अॅपच्या सक्तीचा मात्र आजच्या सूचनेत उल्लेख नाही. 

कोरोना महासाथीमुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे रखडलेली सीबीएसई मंडळाची बारावीची परीक्षा देशभरात होईल तर दहावीची परीक्षा फक्त दंगलग्रस्त ईशान्य दिल्लीत होईल. एकूण २९ विषयांची परीक्षा घेण्यात येईल. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल तारखांची घोषणा होईल, असे सांगितले होते. मात्र आज तारखा जाहीर झाल्या. बारावीचे उर्वरित विषयांची परीक्षा १ ते ११ जुलैपर्यंत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत. फक्त दिल्लीत दहावीच्या परीक्षेचे सहा पेपर १ ते १५ जुलैदरम्यान होतील. यात १ जुलैला समाजशास्त्राची तर १५ जुलैला गणित, अर्थशास्त्र, इतिहास व जीवशास्त्राची परीक्षा होईल. बारावीचा पहिली गृहविज्ञान (होमसायन्स) विषयाची परीक्षा १ जुलैला होईल. २ जुलैला हिंदी मुख्य व समन्वित हे पेपर होतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक 
१ जुलै - गृहविज्ञान, २ जुलै - हिन्दी समन्वित व हिन्दी मुख्य, ३ जुलै - भौतिकशास्त्र , ४ जुलै - अकाउंटस, ६ जुलै- रसायनशास्त्र (फक्त ईशान्य दिल्लीसाठी), ७ जुलै- इंफॉर्मेटिक्स प्रॅक्टिकल, संगणकशास्त्र (प्रत्येकी दोन पेपर), ८ जुलै - इंग्लिश इलेक्टिव्ह- एन व सी, ९ जुलै- बिझिनेस स्टडीज, १० जुलै - जैवतंत्रज्ञान (बॉयोटेक्नोलॉजी), ११ जुलै - भूगोल, १३ जुलै- समाजशास्त्र, १४ जुलै - पोलिटिकल सायन्स (फक्त ईशान्य दिल्ली), १५ जुलै - गणित, अर्थशास्त्र, हिंदी, जीवशास्त्र (ईशान्य दिल्ली). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com